लवकरच ‘तेजस’ रेल्वे धावणार इतर रेल्वेमार्गावर – रेल्वे महासंचालक डी.सी. शर्मा

0

मुंबई (पंकज जोशी) | मेक इन नाशिकला रेल्वेचा पूर्णपणे पाठींबा आहे. लवकरच तेजस रेल्वे महाराष्ट्रात इतर मार्गांवर सुरु होईल अशी माहिती रेल्वेचे महासंचालक डी.सी.शर्मा यांनी दिली. ते मेक इन नाशिक कार्यक्रमात संबोधित करत होते.

यावेळी शर्मा म्हणाले, मनमाड जळगाव, दौंड मनमाड मार्गांचे विद्युती करण पूर्ण झाले आहे.  कल्याण मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामाला परवानगी मिळाली आहे.

मेक इन नाशिक साठी रेल्वेचा पाठिंबा असून नाशिक येथील रेल्वे अभियंता प्रशिक्षण केंद्रात आणखी आधुनिक सुविधा पुरविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

*