Type to search

ब्लॉग

Blog: तंत्रयुग आणि रोजगार

Share

भारतात संगणकाचा वापर जसजसा वाढत गेला, तसतसे नोकर्‍यांचे स्वरूपही झपाट्याने बदलत गेले. रोजगारांच्या संदर्भाने या बदलाला डिजिटल क्रांती हे नाव देण्यात आले. सुरुवातीच्या काळात या बदलांना बराच विरोध झाला; परंतु अखेर धोरणे बदलली आणि अखेरीस कामकाजाचे स्वरूपही बदलू लागले. मोठमोठे रजिस्टर कॉम्प्युटर ऐंशीच्या दशकात छोट्या हार्डडिस्कमध्ये सामावू लागले. तज्ज्ञ कर्मचार्‍यांची मागणी वाढली. या प्रक्रियेतील दुसरा मोठा बदल नव्वदीच्या दशकात आला. त्यावेळी इंटरनेटचा वापर सुरू झाला. कम्प्युटिंगच्या बरोबरीनेच नोकर्‍यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर बदलू लागले. हा बदल पहिल्या बदलाच्या तुलनेत अधिक गतिमान आणि सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असणारा ठरला. एकवीसाव्या शतकाच्या उदयाबरोबर तर नोकरीची व्याख्याच बदलून गेली.

आयटी, बीपीओ, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या विश्‍वात डेटा आणि सिस्टिम अ‍ॅनालिस्ट अशा स्वरूपाच्या पदांचा निम्न स्तरांवरील नोकर्‍यांवर मोठा परिणाम झाला. दळणवळण आणि माहितीच्या क्रांतीबरोबर कारकुनी स्वरूपाच्या नोकर्‍यांचे रूपांतर ऑपरेटिंग सिस्टिमफमध्ये झाले. दुसरीकडे नव्या ऑनलाइन दुनियेचा उदय झाला. त्याचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडला. स्वयंचलित यंत्रांद्वारे सुरू होणार्‍या वाटचालीचा पाया रचला गेला आणि नोकरदारांसाठी धोक्याची घंटा वाजली. आता पुन्हा एकवार आपण नोकर्‍यांचे स्वरूप, दिशा आणि दशा बदलण्याच्या उंबरठ्याशी येऊन ठेपलो आहोत.

हे बदल माणसाकडून यंत्राकडे असे नसून, यंत्राकडून यंत्राकडे असे असतील. याबाबत करण्यात आलेल्या अध्ययनांचे निष्कर्ष असे सांगतात की, आगामीकाळात आधुनिकीकरण आणि ऑनलाइन या बाबी एकाच सूत्रात गुंफल्या जातील. माणूस विशिष्ट क्षमता प्राप्त करू शकत नाही, तोपर्यंत त्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाही. जगातील सर्वांत मोठी प्रोफेशनल सर्व्हिस फर्म मानल्या गेलेल्या पीडब्ल्यूसी या लंडनमधील संस्थेची भारतातील शाखा असलेली ऑल इंडिया मॅनेजमेन्ट असोसिएशन (एआयएमए) ही भारतातील या क्षेत्रातील सर्वांत मोठी संस्था मानली जाते. या संस्थेने भविष्यातील नोकर्‍यांबद्दल सावध होण्याचा इशारा दिला आहे. संस्थेच्या मते, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि कम्प्युटर व्हिजन आणि इंटरनेट ऑङ्ग थिंग्ज (आयओटी) यांच्या मदतीने तंत्रज्ञानाच्या स्वरूपात झपाट्याने विकसित होत असलेल्या उद्देशांबाबत ही सतर्कता असायला हवी. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या वाढत्या भूमिकेमुळे भविष्यातील रोजगारांचे स्वरूप आणि त्यातील मानवी भूमिका याबाबत कुतूहल असले, तरी या प्रक्रियेत अनिश्‍चितताही मोठी आहे.

मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया – टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्म अ कनेक्टेड नेशनफ या अहवालात म्हटले आहे की, रोजगारांचे स्वरूप बदलण्याबरोबरच त्यांची संख्याही वाढेल. भारत वेगाने डिजिटल होत आहे आणि त्यामुळे रोजगारांबरोबरच अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेत 2025 पर्यंत सहा ते साडेसहा कोटी नवे रोजगार निर्माण होऊ शकतात. अर्थात, दुसरीकडे या प्रक्रियेत साडेचार कोटी नोकर्‍या संपणारही आहेत. ऑनलाइन नेटवर्किंगमुळेच हे फायदे – तोटे होणार आहेत. याचा परिणाम कृषी, आरोग्य, परिवहन आणि शिक्षणाच्या क्षेत्रावर होईल.

मोठे आणि लहान व्यावसायिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीही या प्रक्रियेचा उपयोग होईल. दुसरीकडे, मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाचा लाभ प्रभावीपणे घेऊ शकतील. डिजिटल क्रांती आणि त्यानुसार बदलता रोजगार आलेख यासंदर्भाने सरकारच्या आतापर्यंतच्या धोरणाकडे पाहिल्यास, त्यात अनेक त्रुटी दिसून येतील. चाळीस वर्षांपूर्वी संगणक आले, तेव्हाचा विचार करता असे दिसते की संगणकीय ज्ञान देशातील अनेक विद्यार्थ्यांपासून आजही दूरच राहिले आहे. वस्तुतः हे ज्ञान शालेय शिक्षण घेतानाच मिळायला सुरुवात झाली पाहिजे. थोडक्यात, संगणकीय क्षेत्राचा आपल्या देशातील पाया आजही ङ्गारसा मजबूत नाही. त्यानंतर आलेल्या इंटरनेट क्रांतीच्या काळातही सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलली नाहीत. या क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या नाहीत आणि बदलही वेगाने स्वीकारले गेले नाहीत. परिणामी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पाहता-पाहता आपल्या देशातील व्यवसाय, नोकर्‍या आणि बाजारव्यवस्था बदलून टाकली. गूगलच्या तोडीचे सर्च इंजिन आपण विकसित करू शकलो नाही.

गूगलप्रमाणेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्यावर कब्जा मिळविला आहे. आताही इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्स या बाबीही बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फतच येत आहेत. त्या स्वीकारणे आपल्यासाठी अपरिहार्य बनले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या संदर्भात धोरण आखण्यात सरकार कमकुवत ठरले. असोचेमच्या अध्ययनानुसार, इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे लोकांना प्रत्येक बाबतीत पर्याय उपलब्ध झाला असून, असंख्य उपकरणे, वाहने, घरगुती साहित्य आणि यंत्रसामग्री लवकरच या तंत्रज्ञानाने जोडली जाणार आहे. तसे पाहायला गेल्यास 2020 पर्यंत इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात 15 अब्ज डॉलर गुंतवणूक व्हावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात भारताची हिस्सेदारी सहा टक्के अपेक्षित आहे.

अर्थातच, यामुळे नव्या प्रकारच्या नोकर्‍यांची संधी निर्माण होईल. या नोकर्‍यांची रूपरेषा कशी तयार होईल? त्याचा लाभ कोणाला किती प्रमाणात मिळेल? हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे? स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी इंटरनेट ऑङ्ग थिंग्ज क्षेत्रातील कौशल्य विकास कसा साधता येईल? या प्रश्‍नांची उत्तरे लवकरात लवकर मिळणे अपेक्षित असून, त्यासाठी सरकारने सर्वांना सजग करण्याची गरज आहे. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या मते, हे बदल स्वीकारण्यासाठी देशोदेशीची सरकारे, व्यावसायिक जगत आणि सामान्य नागरिक यांची संमिश्र भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारने नोकर्‍या निर्माण करणे, कार्यसंस्कृती विकसित करणे आणि कौशल्य विकासातील जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम सजग होणे गरजेचे आहे. व्यावसायिक जगतानेसुद्धा केवळ स्पर्धा करायची म्हणून नव्हे, तर गरजेप्रमाणेच इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिङ्गिशियल इन्टेलिजन्स यांसारखे तंत्रज्ञान स्वीकारणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नोकरीच्या संदर्भातील पारंपरिक मनोभूमिका बदलणे गरजेचे असून, शिका, मिळवा आणि पुढे चलाफ हे सूत्र अवलंबिणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या डिजिटलायझेशनचा सर्वांत मोठा परिणाम रोजगारसंधीतील बदलाच्या स्वरूपात समोर येत आहे. वस्तुतः यांत्रिकीकरणामुळे काम करण्याचा वेग, प्रक्रिया आणि शैली सातत्याने बदलत आहे. त्यामुळेच आगामी काळात एकीकडे तंत्रज्ञानात कुशल असलेल्या व्यक्तींना असलेली मागणी वाढत जाईल, तर दुसरीकडे काही पारंपरिक निर्मितीप्रक्रियेत सहभागी असलेल्या अनेकांवरील संकट गडद होत जाईल. बदलत्या तंत्रयुगात रोजगार क्षेत्राचे स्वरूप कसे असेल, यावर एक कटाक्ष…

एआयएमए आणि बीडब्ल्यूसीने संयुक्तरीत्या उत्पादन, आरोग्य, शिक्षण, आयटीईएस, बँकिंग आणि वित्तपुरवठा सेवा अशा क्षेत्रांमधील 600 पेक्षा अधिक संस्थांचे सर्वेक्षण केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आगामी काळाती नोकर्‍यांमध्ये कोणते बदल घडवीत आहे? आपल्याकडील श्रमशक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येणारे बदल स्वीकारण्यास कितपत सक्षम आहे? उच्च शैक्षणिक स्तर असलेल्यांसाठी या क्षेत्रात कोणत्या शक्यता दिसतात? तसेच सामान्य स्तराचे किंवा अव्यावसायिक शिक्षणक्रम करणार्‍यांचे स्थान कोणते असेल? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला.

– महेश कोळी, संगणक अभियंता

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!