जुलैमध्ये लाँच होणाऱ्या रेडमी ४ प्रोची स्पेसिफिकेशन्स लिक

0

मुंबई : शाओमीने गतवर्षी लाँच केलेल्या एमआय मॅक्स ३ ला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनी त्यांचा नवा एमआय मॅक्स ४ आणि एमआय मॅक्स ४ प्रो जुलैमध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत असतांना या फोनची काही स्पेसिफिकेशन लिक झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एमआय मॅक्स ४ प्रो ७.२ इंची नॉच स्क्रीन डिस्प्लेसह असणार आहे. त्याच्या फ्रंट आणि रिअर साईडला गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले गेले असून रिअर कॅमेरा ४८ एमपीचा आहे. या फोनच्या रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला असून अँड्राईड ९.० पाय ओएसला तो सपोर्ट करेल. फोनला ५८०० एमएएचची दमदार १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंग बॅटरी दिली गेली आहे.

या फोनच्या ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी १६९००, ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज साठी १६९०० तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज साठी १९००० मोजावे लागतील असे समजते. या फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

LEAVE A REPLY

*