शाओमी लाँच करणार सतरा मिनटात चार्ज होणारा स्मार्टफोन

0

मुंबई : ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या शाओमी कंपनी लवकरच सतरा मिनटात चार्ज होणारा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला शंभर वॅटच्या सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग करणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजीची घोषणा केली आहे.

दरम्यान विवो कंपनीच्या वीओओसी चार्जिंगसाठी पर्याय म्हणून कंपनीने ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. तसेच रेडमी स्मार्टफोनसाठी ही टेक्नॉलॉजी प्रथम उपयोगात आणणार आहे. कंपनीने याबद्दल अधिक माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच सुपरचार्ज टर्बो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ४००० mAh ची बॅटरी फक्त १७ मिनिटात फूल चार्ज होणार आहे.

तर लवकरच ही टेक्नॉलॉजी लॉन्च करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर ओप्पो वीओओसी फ्लॅस या टेक्नॉलॉजीच्या मदतीने ३७०० mAh ची बॅटरी ६५ टक्के चार्ज होऊ शकते.

LEAVE A REPLY

*