Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

व्हाट्सअँपला लवकरच बुमरॅंग फिचर येणार

Share

मुंबई : सोशल मीडियात सर्वात प्रभावी माध्यम म्हणून व्हाट्सपकडे पहिले जाते. आज जवळपास ३० कोटीच्या आसपास लोकांकडे व्हाट्सअँप आहे. दरम्यान इंस्टाग्रामवरील पसंतीस असलेले बुमरँग फिचर लवकरच व्हाट्सअँप ला येणार आहे.

आता पर्यंत व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मेसेज, व्हिडिओ, फोटो किंवा GIF फाइल्स एखाद्याला पाठवता येत होते. मात्र आता या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअँपवर चॅटिंग करणे अधिक मजेशीर होणार आहे.

एका मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअँपवर बुमरॅंन्ग फिचर देण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला बुमरॅंन्ग पद्धतीने व्हिडिओ बनवता येणार आहे. त्यानंतर लागलीच समोरच्या व्यक्तीला पोस्ट सुद्धा करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअँपमध्ये व्हिडिओ फक्त GIF फाइल्समध्ये रुपांतर करण्याचे फिचर देण्यात आले आहे.

बुमरॅंन्ग फिचर प्रथम आयफोन युजर्सला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर अँन्ड्रॉइड युजर्सला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!