Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

आता व्हॉट्स अॅपवर ईमोजी ऐवजी पाठवा स्टिकर्स

Share

मुंबई : व्हॉट्स अॅप आता सगळ्या सुविधासाठी ओळखले जाते. व्हिडीओ कॉल, प्रायव्हेट मॅसेज, एवढेच नाहीतर पैसे देखील पाठवू शकतो. पण आता व्हाट्सअँप ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फिचर आणले आहे. whatsapp stickers नावाचं नवीन फिचर होय. इमोजीव्यतिरिक्तही वेगळे आणि आकर्षक असे हे स्टिकर्स असणार आहे.

परंतु हे स्टिकर पाठवायचे कसे…
व्हॉट्स अॅप बिटा व्हर्जनवर हे स्टिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे हे स्टिकर्स वापरायचे असतील तर व्हॉट्स अॅप अपडेट करावं लागेल.  व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर चॅट विंडोमध्ये सर्वात शेवटी असणाऱ्या इमोजीच्या आयकॉनवर क्लिक करावं. त्यानंतर इमोजीची विंडो ओपन होईल. या ठिकाणी पर्याय असतील यात सर्वात शेवटचा पर्याय हा ‘व्हॉट्स अॅप स्टिकर्स’चा असणार आहे.

याव्यतिरिक्त स्टिकर्सच्या बाजूला असणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर्सना हे वेगवेगळे स्टिकर्स हे डाऊनलोडही करता येणार आहेत. ‘my stickers’ मध्ये डाऊनलोड केलेले सगळे स्टिकर्स सेव्ह होणार आहेत. हे स्टिकर्स नको असल्यास ते डिलीट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

या फीचरमध्ये आपणही स्टिकर्स तयार करू शकतो. मात्र स्वत:चे स्टिकर्स तयार करण्यासाठी युजर्सला एक अॅप डाऊनलोड करावं लागले. यासाठी प्लेस्टोअरमध्ये काही अॅप उपलब्ध असून याद्वारे तयार करण्यात आलेला स्टिकर्स डायरेक्ट आपण व्हॉट्स अॅपवरही पाठवू शकतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!