Type to search

लवकरच ट्विटरमध्ये सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर

टेक्नोदूत मार्केट बझ

लवकरच ट्विटरमध्ये सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर

Share

मुंबई : सोशल मीडियावर प्रभावशाली माध्यम म्हणून ओळखले जाणारे ट्विटर आपल्या ग्राहकांना वेगवेगळे फीचर्स देत असते. ट्विटर काही दिवसांपूर्वीच ट्विट एडिट करणारे फिचर देणार असल्याचे म्हटले होते. त्यातच आता लवकरच ट्विटर सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर आणणार आहे. युजरला या फिचरमुळे कोणालाही फॉलो न करता त्यांच्या ट्विटचे नोटिफिकेशन मिळणार आहे.

ग्राहकांना या फीचरनंतर कोणत्याही ट्विटला लाईक आणि रिप्लाय न करताच त्यासंबंधी अपडेट घेऊ शकणार आहेत. युजरला यासाठी केवळ सब्सक्राईब बटनवर क्लिक करावे लागणार आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर या फिचरचे सध्या टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या अधिकृत लाँचिंगची घोषणा अद्याप झालेली नाही. यासंबंधी ट्विटरने एक ट्विट प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान लवकरच एडिट फिचर देखील येणार असल्याची माहिती ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीत सांगितली होती. पण त्यांनी किती वेळासाठी ट्विट एडिट करता येणार यासंबंधी माहिती दिलेली नव्हती. या शिवाय कंपनी टेक्स्ट फॉरमॅटमध्ये SMS फिचर देण्याच्याही तयारीत असल्याचे समजते. मात्र सेंड केलेल्या मॅसेजला बॅक घेता येणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!