Type to search

पुन्हा एकदा ‘टिकटॉक’ जगभरात धुमाकूळ घालणार

Breaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

पुन्हा एकदा ‘टिकटॉक’ जगभरात धुमाकूळ घालणार

Share

मुंबई : ३० कोटी युझर्स असणाऱ्या टिकटॉकवर नुकतीच बंदी आणली असताना पुन्हा एकदा टिकटॉक सुरु होणार आहे. यासाठी टिकटॉक कंपनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

टिकटॉक हे मूळचे चिनी अँप असून चीनमधील बाईट डान्स स्टार्टअप कंपनीचे अँप आहे. याच कंपनीने भारतात एक डॉलरची गुंतवणूक करून विगो, हेलो आणि टिक टॉक यासारख्या अँपचे लौंचिंग केले होते. परंतु काही दिवसांपूर्वी टिकटॉक बंदी आल्याने बाईट डान्स कंपनी पुढील महिन्यात भारतात एक नवीन अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन लाँच होणारे अँप टिक टॉकसारख असेल की इतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट केलं नाही.

भारतात टिक टॉक अँपचे एकूण ३० कोटी यूजर्स आहेत. या अँपने खूप कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. पण काही आक्षेपार्ह व्हिडीओ या अँपच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याने मद्रास हायकोर्टाकडून या अँपवर बंदी घालण्यात आली.

हायकोर्टाच्या आदेशानंतर कंपनीने गुगल प्ले स्टोअरमधूनही अँप हटवला. यामुळे नवीन युजर्स हा अँप डाऊनलोड करु शकत नाही, मात्र ज्या यूजर्सकडे हा अँप आहे ते याचा वापर करु शकतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!