Video : १४ वर्षांपूर्वी याच दिवशी युट्युबवर अपलोड झाला होता पहिला व्हिडीओ

0

नाशिक : सध्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण गुगलची मदत घेत असतो. काही शोधायचे असेल तर आपण लगेचच गुगल करतो. अनेक व्हिडिओसाठी युट्युबचा वापर करतो.

विविध व्हिडीओ, सिनेमा, गाणी मिळवण्याचे एकमात्र प्लॅटफॉर्म म्हणून युट्युबला ओळखला जाते. याच युट्युबवर १३ वर्षाआधी म्हणजेच आजच्या दिवशी २३ एप्रिल रोजी पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. आणि आज युट्युब वेगळ्याच उंचीवर येऊन ठेपल आहे.

दरम्यान या अपलोड झालेल्या पहिल्या व्हिडीओचे शीर्षक मी अँट द झू (me at the zoo) हे होत. या व्हिडिओला युट्युबचे सह संस्थापक जावेद करीम यांनी २३ एप्रिल २००५ रोजी अपलोड केले होते. ‘मी अँट द झू’ हा व्हिडीओ आत्तापर्यंत सहा कोटी लोकांनी पाहिला आहे.

युट्युबचा वापर ८८ देशांमध्ये ७६ भाषांमध्ये केला जातो. युट्युबवर दर मिनिटाला ४०० तासांच्या बरोबरीचे व्हिडीओ अपलोड केले जातात.

LEAVE A REPLY

*