अबब ! एक टीबीचे एसडी कार्ड बाजारात दाखल; किंमत ऐकून व्हाल थक्क

0

मुंबई : जर आपल्याला फोटो काढायची वाद असेल परंतु डेटा स्टोरेजमुळे मोबाईलमध्ये जास्त डेटा ठेवता येत नाही तर निराश व्हायचे कारण नाही. कारण पेन ड्राईव्हसाठी प्रसिद्ध असलेली सँडिस्क या कंपनीने तब्बल एक टीबीचे (एक हजार जिबी ) एसडी कार्ड बाजारात दाखल केले आहे.

दरम्यान बार्सिलोना येथे सुरु असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC २०१९) या कार्यक्रमात कंपनीने जगातील पहिले 1 टीबी मायक्रो एसडी कार्ड सादर केले.
सध्या वेगवेगळ्या कंपन्या चांगल्या कॉलिटीचे कॅमेरा स्मार्टफोनला देत असून त्याद्वारे एचडी कॉलिटीचे छायाचित्र तसेच व्हिडिओ काढण्यात तरुणाई व्यस्त असते. परंतु यासाठी लागणाऱ्या स्टोरेजचा अभाव सध्याच्या स्मार्टफोन्सना दिसून येतो. त्यामुळे सँडिस्कने हे एसडी कार्ड तयार केले आहे.

हे १ टीबी सँडिस्क एसडी कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असून एप्रिल २०१९ पर्यंत किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असल्याची माहिती सॅडिस्कने दिली. याची किंमत जवळजवळ ४९९. ९९ डॉलर इतकी असून त्याची भारतीय किंमत ३५ हजार पाचशे पंचवीस रुपये एवढी आहे. या एसडी कार्डमध्ये ५१२ क्षमतेचेही कार्ड असून त्याची किंमत १९९.९९ डॉलर आहे.

LEAVE A REPLY

*