टीव्ही चे उत्पादन करणारी ‘ही’ कंपनी भारतातून होणार बंद

0

चेन्नई : तंत्रज्ञानातील महत्वाची कंपनी म्हणून ओळखली जाणारी एका बड्या कंपनीने भारतातून टीव्हीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ती कंपनी आता भारत उद्पानदान न घेता भारताबाहेर घेणार आहे. सध्या या कंपनीचे उत्पादन चेन्नईमधून होत आहे ते आता व्हिएतनाममधून भारतात टीव्ही कंपनी आयात करेल. तर हि कंपनी आहे सॅमसंग होय.

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईमधील यूनिटमधून सॅमसंगच्या ३ लाख टीव्हींचे उत्पादन होते. बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आल्यामुळे कंपनी नाराज झाल्याचे बोलले जाते.

टीव्ही पॅनल बजेटमध्ये बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलवर १० टक्के आयात शुल्क वाढवण्यात आले होते. पण अनेक कंपन्यांनी विरोध केल्यानंतर हे शुल्क घटवून अर्ध्यावर करण्यात आले. २०१६-१७ या वर्षामध्ये सॅमसंगला भारतात ८ अरब डॉलरचे महसुली उत्पन्न मिळाले होते.

LEAVE A REPLY

*