Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

आता जिओची आंतरराष्ट्रीय ग्राहकांना रोमिंग सेवा

Share

मुंबई : देशात टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे ग्राहकांना भुरळ घातली आहे. त्यात रिलायन्स जिओ अग्रेसर असून नुकतेच परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. रिलायन्स जिओ आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये ४ जी सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून कंपनीने जपानच्या केडीडीआयशी करार केला आहे.

या सेवेमुळे भारतीय ग्राहक जपानला व जपानी ग्राहक भारतात या सेवेचा उपयोग करू शकतात. म्हणजेच नागरिकांना दोन्ही देशांमध्ये नंबर न बदलता ४ जी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

भारतात इंटरनेट वापरासोबत व्हॉईस कॉलिंगही जपानी नागरिक करू शकणार आहे. जिओ आणि केडीडीआयच्या वापरकर्त्यांनाच ही सेवा मिळणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!