Type to search

लवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

लवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार

Share

मुंबई : अवघ्या कमी कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस पडलेल्या रेडमीने Redmi Y3 स्मार्टफोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात येत्या २४ एप्रिल हा स्मार्टफोन लाँच होता असून खास सेल्फीसाठी हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत आहे.

शाओमी रेडमी कंपनी कमी दरात अनेक फिचर देणारे स्मार्टफोन्स लाँच करता असते. येत्या २४ एप्रिलला Redmi Y3 स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली असून त्यामध्ये सेल्फीसाठी ३२MP कॅमेरा देण्यात आला आाहे.

यापूर्वी कंपनीने Y सिरिजमधील दोन स्मार्टफोन- Redmi Y आणि Redmi Y2 लॉन्च केले होते. तसेच सेल्फीसह पावरफुल बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. ५.९९ इंचाचा डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon ६२५ प्रोसेसर असणार आहे.

रेडमीचा हा स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येणार असून त्यामध्ये 4GB RAM आणि दुसऱ्या वेरियंटमध्ये 6GB RAM असणार आहे. तसेच गोल्ड, डार्क ग्रे, ब्लू, रोज गोल्ड आणि ब्लॅक अशा रंगामध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार असून त्याची किंमत १२ हजार रुपयापर्यंत असणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!