Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

दोन स्मार्टफोनसह रेडमीने ३६० डिग्रीत फिरणारी सुटकेस केली लाँच

Share

मुंबई : सध्या स्मार्टफोनच्या बाजारात ग्राहकांच्या पसंतीचे नाव असलेलय शाओमी कंपनी इतरही वेगवेगळ्या उत्पादनांकडे वळताना दिसत आहेत. रेडमीच्या स्मार्टफोन व्यक्तिरिक्त कंपनीचे शूज, वाशिंगमशीन, टीव्ही यांसारखे अनेक दमदार उपकरण बाजारात आणले आहेत. यानंतर आता कंपनीने सूटकेस लाँच केली आहे.

दरम्यान शाओमीने दोन स्मार्टफोन लाँच केले असून यासोबतच हि सुटकेस देखील लाँच केली आहे. रेडमी K20 प्रो आणि रेडमी K20 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. स्मार्टफोनसोबत असलेली सुटकेस तयार करण्यासाठी कॉस्ट्रॉन पीसी मटेरियलच्या तीन थरांचा वापर करण्यात आल्याचं कंपनीने सांगितल आहे.

यामुळे ही सूटकेस इतरांच्या तुलनेत अधिक मजबूत असल्याचं कंपनीने म्हटलं. मॅट फिनिशिंगसह ०४ व्हिल्स ३६० डिग्रीत रोटेट होणारे व्हिल्सही देण्यात आले आहेत. अँल्युमिनियम पासून तयार करण्यात आलेले ट्रॉलीचे हे हँडल 4 गिअरपर्यंत अडजस्ट करता येतं.

सूटकेसच्या आतील बाजूसाठी सॉफ्ट आणि स्क्रीन फ्रेंडली अशा पॉलिस्टर व्हायबर फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. जून महिन्यात या सूटकेसची विक्री सुरू होईल. याची किंमत २९९ युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३००० रुपये आहे. रेडमी K20 स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या काही निवडक ग्राहकांसाठी ही सूटकेस केवळ १९९ युआन म्हणजे जवळपास २००० रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!