Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

दमदार फीचर्ससह ओप्पो के १ भारतीय बाजारात दाखल

Share

मुंबई : ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्मार्टफोन कंपनीपैकी ओप्पो कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Oppo K1 असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याबरोबरच ओप्पोची एक नवीन सिरीज लाँच झाली आहे. चीनमध्ये ऑक्टोबर २०१८ ला प्रथम हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. चीनमध्ये लाँच केल्यानंतर भारतात दाखल झाला असून याची किंमत १६,९९९ रुपये आहे.

या फोनला ६.४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

दरम्यान १२ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवरुन हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. तसेच या मोबाईलला नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येणार आहे. पियानो ब्लॅक आणि निळ्या या दोन रंगात लाँच करण्यात आला असून संरक्षणासाठी या फोनला गोरिल्ला ग्लास लावण्यात आली आहे.

यामध्ये २५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी आणि ६ जीबी रॅम असलेले दोन व्हेरियंट देण्यात आले आहेत. या दोन्हीची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!