Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

भारतात ‘ई कार’ वापराचे प्रमाण दुर्मिळ

Share

नाशिक : प्रदुषणाने धोक्याची पातळी पार केलेली असताना, देशभरातील अफाट रस्त्यांवर ‘ई-कार’ आणण्यात मात्र भारत अपयशी ठरला आहे. ई कार्सचा वापर करून अवघे जग ‘क्लीन अँड ग्रीन ड्राईव्ह’च्या दिशेने पाऊल उचलत असताना भारतात ई कारचे प्रमाण मात्र दुर्मिळ आहे.

भारतात या ई कार आवश्यकता का भासते ले लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये कारची रनिंग कॉस्ट परवडणारी आहे. हि कार अपारंपरिक उर्जेवर चालणारी आहे. प्रदूषणरहित, हरितगृह उत्सर्जन कमी करणारी आहे. तुलनेने शांत आणि संथ असल्यामुळे ड्राईव्हला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी या कारचा विचार करणे आवश्यक आहे.

भारतीय नागरिकांसाठी ही कार महाग आहे. तसेच भारतात चार्जिंग स्थानकांची संख्या कमी, नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारात येण्यास अधिक उशीर लागणार, ग्राहकांसाठी प्रोत्साहनपर योजनांची कमतरता, अनेकजण तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ असल्याने ई कार बाबत भारतीय नागरिकापुढील आव्हाने आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!