Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

गुगलचे ‘Allo’ मेसेजिंग ऍप लवकरच बंद होणार

Share

मुंबई : गुगलच्या नवनवीन संकल्पना ग्राहक वापरात असतात. त्यामुळे ग्राहक संख्येतही भर पडत आहे. परंतु गुगल लवकरच एक मेसेंजर अॅप बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. या अॅप्लिकेशनचे नाव गूगल Allo असे आहे. युझर्सकडून या अॅपला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च २०१९ पर्यंत Allo अॅप सुरु असेल. युजर्स तोपर्यंत अॅपवरील मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकतात, अशी माहिती गूगलने दिली. मशिन लर्निंगवर आधारित असलेले फिचर्स आणि गूगल असिस्टंटला मेसेंजर अॅपमध्येच इनबिल्ट करणे, या बाबी आम्ही, Allo अॅपद्वारे शिकलो, असे गुगलने सांगितले.

Allo अॅपमध्ये यंदा एप्रिल महिन्यापासूनच गुंतवणूक करणे बंद केले होते. अनेक फिचर्स या अॅपमध्ये उपलब्ध होते. पण तरीही Allo ला व्हॉटसअॅप समोर अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!