आता गुगल पेवरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार

0

मुंबई : सध्या सगळी क्षेत्रे डिजिटल झाल्याने प्रत्येक गोष्टीला डिजिटल महत्व प्राप्त झाले आहे. मनीट्रान्स्फर क्षेत्रातील महत्वाचे अँप म्हणजे गुगल पे देखील तितकेच वापरले जात आहे.

आता गुगल पे वरही आयआरसीटीसी ऑनलाईन ट्रेन तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून अँड्रॉईड आणि iOS प्लॅटफॉर्मवरही हा सपोर्ट देण्यात आला आहे. युजर्सना या सर्व्हिसच्या माध्यमातून गुगल पे च्या सहाय्याने ट्रेनचे तिकीट बुक अथवा कॅन्सलही करता येईल.

दरम्यान ही सुविधा अनेक अँपला उपलब्ध होती. त्यामध्ये abhiBus, Goibibo, RedBus, Uber आणि Yatra समवेत कॅब आणि बस तिकीट बुकिंग विकल्पांसंदर्भात युजर्सचा खुप चांगला प्रतिसाद होता.

आता गुगल पे वरही आयआरसीटीसी हे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ट्रेनचा प्रवास प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.

LEAVE A REPLY

*