Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

फेसबुक नियुक्त करणार २० हजार कर्मचारी; अडीच ते चार लाखाचं पॅकेज

Share

मुंबई : सोशल मीडियावर तरुणांचे सर्वात जास्त आवडतीचा माध्यम असणाऱ्या फेसबुकने काही दिवसांपूर्वी समाजातील विघातक वृत्तीनं आळा घालण्यासाठी आणि अश्लिल मजकूर हटवण्यासाठी २० हजारमजकूर नियंत्रक नियुक्त करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता लवकरच या बाबत फेसबुक ठोस निर्णय घेणार असून हजारो पदवीधर उमेदवारांनी फेसबूकमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

या प्रादेशिक भाषांमध्ये होणार नियुक्ती
मजकूर नियंत्रकाची नियुक्ती करण्यासाठी फेसबूकनं बिजनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) कंपनी जेनपॅक्टला कंत्राट दिलं आहे. ही कंपनी मराठी, पंजाबी, तामीळ, कन्नड, उडिया, नेपाळी या भाषांसाठी कंटेंट मॉडरेटर्स घेणार आहे. जेनपॅक्टनं ऑनलाईन एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत.

असे असणार काम?
फेसबूक नियंत्रक म्हणून नियुक्ती झाली तर फेसबुक वापरकर्त्याने फेसबूकवर टाकलेल्या पोस्ट किंवा मजकूर आणि व्हिडिओला मॉनिटर आणि मॉडरेट करण्यात येईल. लैंगिक शोषण, दहशतवाद, लहान मुलांचं लैंगिक शोषण, आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ आणि हिंसात्मक मजकुरावर कारवाई आणि असा मजकूर डिलीट किंवा ब्लॉक करण्याचं काम फेसबूक नियंत्रकाला करावं लागणार आहे. मजकूर नियंत्रकांना वर्षाला २.५ लाख ते ४ लाख रुपयांचं पॅकेज देण्यात येणार आहे. महिन्याच्या पगाराबरोबरच मासिक भत्ताही मिळणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!