Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

एअरटेलचा १६९ रुपयांचा धमाकेदार प्लॅन घेतलात का ?

Share

मुंबई : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे बाजारात प्रत्येक दिवशी आयडिया, वोडाफोन आणि एअरटेलसारख्या कंपन्यां आपले स्वतातील प्लान्स देत असते.

एअरटेलने आकर्षक सुविधा असलेला प्लॅन लाँच केला आहे. १६९ रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन असून मागील आठवड्यात तो लाँच करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ग्राहकांना या १६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड मोफत लोकल आणि एसटीडी कॉल तसेच २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत.

२८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग असे म्हटले असेल तरीही ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटे मोफत मिळणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!