येत्या सप्टेंबर मध्ये अॅपलचे नवे फोन बाजारात दाखल होणार

0

सॅन फ्रॅन्सिको : आयफोनसाठी नावाजलेली कंपनी अॅपल लवकरच आयफोनच्या तीन श्रेणी येत्या सप्टेंबर मध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये आयफोन ९, आयफोन ११ आणि आयफोन ११ पल्स या श्रेणीचा समावेश असणार आहे.

आयफोन ९मध्ये कंपनीकडून ६.१-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात येऊ शकते. आयफोन ११मध्ये ५.८-इंची तर ११ प्लसमध्ये ६.५ इंची OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याशिवाय पेडअप्स, कॅमेरा, सुधारित ७ एनएम ए ११ सीपीयू आणि यूएसबी-सी चार्जर देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आयफोन ९ हा २०१८ या वर्षातील अॅपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. अॅपलकडून नवीन फोनवर आकर्षक ऑफर देण्यात येणार आहे. शिवाय फोनचे स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे एका मार्केट रिसर्च फर्मकडून सांगण्यात आले आहे. ६.१ इंच एलसीडी डिस्प्ले असलेल्या आयफोन ९ची किंमत ५० हजार ते ५२ हजार रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. आताच आलेल्या आयफोन एक्सची किंमत ६५ हजार तर आयफोन एक्स प्लसची ६८ हजार होती. दरम्यान, याआधी आयफोनकडून मागील वर्षी १५ सप्टेंबरला फोन लॉन्च करण्यात आले होते. २२ सप्टेंबरला फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*