Video : पोर्ट एलिजाबेथ येथे असे झाले भारतीय संघाचे स्वागत

0
पोर्ट एलिजाबेथ |  टीम इंडियाला विराट कोहलीच्या नेतृत्वात भन्नाट फोर्म गवसला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंडियातील क्रिकेट सामने अतिशय चुरशीचे होत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतही सध्या सामन्यांची चर्चा रंगली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत चार सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद तीन सामने जिंकले आहेत. तर चौथा जोहान्सबर्ग येथील सामना मात्र डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताचा पराभव झाला.

भारतीय क्रिकेट संघ रविवारी(दि.११) पोर्ट एलिजाबेथ येथे पोहोचला. यावेळी भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडू हॉटेलवर पोहोचताच पारंपरीक वाद्ये वाजविण्यात आली.

अतिशय सुंदर अशा आवाजामुळे भारतीय खेळाडूंनी तर चालता चालता डान्सचा आनंद घेतला. पोर्ट एलिजाबेथ येथे मंगळवारी (दि.१३) पाचवा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.

हॉटेलमध्ये टीम इंडियाच्या झालेल्या स्वागताचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवरही शेअर केला आहे. आतापर्यंत २७ हजार नेटकरयांनी बघितला असून रीट्वीट, लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

व्हिडीओ :

LEAVE A REPLY

*