Video : केक वाया घातला म्हणून…हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी काढली गरिबी

0
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा २४ वा वाढदिवस नुकताच पार पडला. हार्दिकने त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मिडीयावर पोस्ट केले.

या व्हिडीओत हार्दिक पंड्याने केक कापल्यानंतर त्याच्या संपूर्ण अंगावर केक लावला होता. केकच्या झालेल्या नासाडीवरून सोशल मीडियातील युजर्सने मात्र टीम इंडियाच्या या कृत्याचा चांगलाच समाचार घेतला.

अनेकांनी भारतात गरिबी खूप आहे, अनेकांना केक बघायला सुद्धा मिळत नाही आणि तुम्ही खुशाल केकची नासाडी करता असेही अनेक युजर्सने फेसबुकवरच्या कमेंट बॉक्समध्ये देशातील दुष्काळ, गरिबी ला समोर आणून टीम इंडियाच्या आजच्या कृत्याचा चांगलाच समाचार घेत धारेवर धरले आहे.

Everyone's birthday 🎁comes once a year… revenge will be "sweet" 🍰😉#cakesmash #throwback #birthday #teamindia

Posted by Hardik Pandya on 17 ऑक्टोबर 2017

LEAVE A REPLY

*