Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

मयांकचे द्विशतक; ५०२ धावांवर भारताचा डाव घोषित

Share

विशाखापट्टनम | वृत्तसंस्था 

टीम इंडियाने पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजांनी आफ्रिकेची दाणादाण उडवत पहिल्या जोडीने जवळपास ३०० पेक्षा अधिक धावां केल्या. रोहित शर्मा १७६ धावांवर बाद झाल्यानंतर युवा खेळाडू मयांक अग्रवाल याने पहिले वहिले द्विशतक साजरी केले. ५०२ धावांवर भारतीय संघ असताना डाव घोषित करण्यात आला.

पहिल्या दिवशीच्या पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ अर्धवट राहिला तरीही भारताने पहिल्या दिवशी एकही विकेट गमावली नव्हती. रोहित शर्माने आपला फॉर्म दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली.

दुसरीकडे युवा फलंदाज मयांक अग्रवालची सर्वात जास्त चर्चा होता असून आज सकाळी त्याने ८५ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या सत्रात त्याने आपले शतक साजरे केले. त्यानंतर त्याने फलंदाजी सुरु ठेवत मजल दरमजल करत द्विशत साजरी केले. मयांकचे हे पहिले शतक तसेच द्विशत ठरले.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन टेस्ट सामन्याच्या सीरिजमधला पहिला सामना खेळवला जात आहे. विशाखापट्ट्णमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडिअमवर हा सामना रंगला असून यासाठी टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी सामन्यावर पदक मजबूत केली आहे.

मयांकच्या झुंझार खेळीने भारताचा डाव सावरला. यामुळे सोशल मीडियातून मयांकवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. देशातील अनेक ज्येष्ठ खेळाडू तसेच सेलिब्रेटींनी मयांकच्या खेळीवर शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेला पहिला धक्का आर अश्विनने दिला. त्याने अडेन मार्केनला त्रिफळाचीत केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!