Type to search

क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी, अश्विनला डच्चू

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी, अश्विनला डच्चू

Share

मुंबई | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घोषणेची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट बघत होते. अखेर ती घोषणा आज झाली. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला.

15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत.

भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 विश्वचषकही नावावर केला आहे.

विशेष म्हणजे 2011च्या विश्वचषक विजेत्या संघातील सात खेळाडू 2019 च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी या विश्वचषकाच्या टीमची घोषणा केली.

भारतीय संघ –

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!