Type to search

टीम ईथ्रीची ‘मेगा डेअर डेव्हील राईड’ संपन्न

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

टीम ईथ्रीची ‘मेगा डेअर डेव्हील राईड’ संपन्न

Share
नाशिक : टीम ईथ्रीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 100 किलोमीटर सेन्चुरी राईडमध्ये नाशिकमधील अनेक सायकल रायडर्सने सहभाग घेतला. या स्पर्धेत डॉ. हिमांशू थुसे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले तर तन्मय पंत यांनी रौप्य पदक मिळवले.

पन्नास वर्षापेक्षा जास्तच्या गटात माणिक निकम, २१ ते ५० वयोगटात भरत सोनवणे आणि २१ पेक्षा कमी च्या वयोगटात ओम महाजन यांना या स्पर्धेत ब्लेझ रायडरचा बहुमान मिळाला.

ही सेन्चुरी राईड म्हणजे सायकलिस्टच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची परीक्षाच होती. अतिशय कठीण मार्गाने सायकल चालवत, शंभर किलोमीटर अंतर वेळेत पूर्ण करण्याचे कसब शिकवणारी होती अशी प्रतिक्रिया टीम ईथ्रीचे गणेश पाटील यांनी दिली.

जुलै महिन्यातील रौप्य पदक विजेते नितीन देशमुख, माणिक निकम, रतन अंकोलेकर, गोरक्षनाथ शिंदे आणि मोहनसिंग राजपूत यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.

सेन्चुरी राईडसाठी अनेक विद्यार्थी, डॉक्टर, वकील, तसेच आर्मीचे जवान सहभागी झाले होते. सर्वांनीच निसर्गाच्या सानिध्यात वैतरणा डॅम राईडचा आनंद घेतला.

रंनिंग कॅटॅगिरीचे विजेते यशराज पांगरे, निलेश थोळे, गणेश माली, संजय पवार, रूट कंटेस्टचे विजेते डॉ. हिमांशू थुसे तर सायकलींग कॅटॅगिरीचे विजेते अरुण पालवे, देवेंद्र पाटील, रामदास सोनवणे, हेमंत अपसुंदे यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला.

असा होता मार्ग
मेगा डेअर डेव्हिल राईड फायर फॉक्स, जुना गंगापूर नाका, नाशिक येथून सुरु होऊन वाडीवऱ्हे – सांजेगाव – शेवगेडांग – पहिने – त्रंबकेश्वर – आंबोली – अंजनेरी – महिरावणी मार्गे पुन्हा नाशिकमधील डॉ पिंपरीकर हॉस्पिटल, गोविंद नगर येथे राईड समाप्त झाली.

राईड यशस्वी करण्यासाठी सेकंड नेचर, फायर फॉक्स लुथ्रा एजन्सी, गिरी मीडिया सर्व्हिस, रेडिओ विश्वास 90.8, डॉ पिम्परीकर हॉस्पिटल, एनर्जल यांचे सर्वांचे योगदान मिळाले तसेच राईड मध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलिस्ट ना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. पुढील राईड 7 ऑक्टोबरला होणार आहे. तरी जास्तीत जास्त सायकलीस्टने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!