टीम ई थ्रीचे सायकलीस्ट करतायत जसपाल सिंग विर्दी यांची स्वप्नपूर्ती

0
नाशिक : सायकलिंगची राजधानी म्हणून नाशिक नावारूपास यावे हे दिवंगत नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांचे स्वप्न होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे पावलोपावली त्यांची उणीव भासत जरी असली तरी त्यांच्या सायकलिस्ट मित्रांनी मात्र दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सेन्चुरी राईडचे आयोजन करत वारसा सुरु ठेवला आहे. दर महिन्याला सायकलीस्ट एकत्र येऊन १०० किमीची सेन्चुरी राईड पूर्ण करतात. दिवसेंदिवस सायकलीस्टच्या संख्येत वाढ होत आहे.

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सेन्चुरी राईडचा श्रीगणेशा करण्यात आला होता. आताची ही तिसरी राईड होती. ३ जून रोजी पार पडलेल्या तिसऱ्या सेन्चुरी राईडसाठी या महिन्यात ५८ पेक्षा सायकलीस्टने सहभाग नोंदवला होता.

याप्रसंगी फ्लॅग ऑफ करण्यासाठी मोहिंदर सिंग भ्रराज, आदित्य केळकर (पुणे),  कल्पना शिंदे (अहमदनगर) आणि फायर फॉक्सचे राज लुथ्रा हे उपस्थित होते.

नाशिक सायकलिंग कॅपिटल व्हावे ही दिवंगत सायकलीस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी टीम ईथ्रीकडून दर महिन्याला राईडचे आयोजन करण्यात येत आहे.

या राईडमध्ये ५० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या गटात माणिक निकम आणि रत्ना अष्टेकर, २१ ते ५० वयोगटात अवधूत लोमटे,  २१ वर्षाखालील गटात अनिकेत जगताप यांना ब्लेझरायडरचा मान मिळाला. 50 किमी मध्ये अमेय देशपांडे, प्रणव रत्नपारखी तर वैष्णव देशमुख पहिल्या तीन क्रमांक मिळवले.

चार महिला, एक दाम्पत्य, दोघे बंधू तसेच अनेक विद्यार्थी, डॉक्टर, वकील, पत्रकार, आर्मी असे एकूण 58 सायकलिस्ट सहभागी झाले, सर्वांनीच या राईडचा आनंद घेतला.

रंनिंग कॅटॅगिरीचे विजेते रवींद्र यादव, सुदर्शन रायते, सचिन पवार तर सायकलींग कॅटॅगिरीचे विजेते तन्मय पंत, दिग्विजय आहेर, गरबी केडीया, धिरज छाजेड, रतन अंकोलेकर यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान पुढील महिन्याची राईड 1 जुलै रोजी होणार आहे. या राईडसाठी जास्तीत जास्त सायकलीस्टने सहभाग नोंदवावा असे आवाहन टीम ईथ्रीचे धिरज छाजेड, गणेश पाटील, विकास जैन आणि राज लुथ्रा यांनी केले आहे.

अशी झाली या महिन्याची सेन्चुरी राईड :

फायर फॉक्स, जुना गंगापूर नाका, नाशिक येथून सुरु होऊन मखमलाबाद – गिरणारे – कश्यपी डॅम – वाघेरा – आंबोली — त्र्यंबकेश्वर – डॉ पिंपरीकर हॉस्पिटल, गोविंद नगर, नाशिक येथे समाप्त झाली.

LEAVE A REPLY

*