16 हजार आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित

0
पाठपुराव्यामुळेे यंदा 5 हजार प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न निकाली
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यभर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असणार्‍या 21 हजार शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. यंदा पाठपुरावा केल्याने 5 हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही 16 हजार आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा प्रश्‍न कायम आहे. यासाठी संघटनापातळीवरून लढा देण्याचा निर्धार शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
नगरला रविवारी हेडगेवार शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा मेळाव्या झाला. यावेळी शिक्षस सहकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संतोष पिट्टलवाड बोलत होते. यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राज्य पातळीवरून ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी अर्ज केल्याने 5 हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या शक्य झाल्या आहेत.
नगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येणार्‍या शिक्षकांना दिलासा मिळलेला नाही. राज्यभर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा प्रश्‍न कायम असल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवतांना अनेक अडचणी येत आहे. या शिक्षकांचा कैटूंबिक प्रश्‍न असल्याने त्यांना मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे.
यावेळी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी जयदिप मोकाटे, जिल्हा सचिवपदी भानुदास खंडागळे, कोषाध्यक्षपदी बाळासाहेब माळवे, जिल्हा कार्याध्यक्षपदी वसंतराव कुलट, महिला प्रतिनिधी म्हणून सुजाता ढवळे यांची निवड करण्यात आली. यावेळी किशोर पवार, संदीप होळकर, राजीव पटेल, विलास बांगर, मारूती देशमुख, गजनान देवकाते, यमाजी महाडीक, गजानन जाधव, सतिष लांडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*