शिक्षक करणार 1 हजार तास अध्यापन

0

शैक्षणिक कामकाजाचे दिवस व सुट्ट्या निश्‍चित

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील प्राथमिक शाळेतील शैक्षणिक कामकाज आणि सुट्ट्याचे धोरण शिक्षण संचालकनांनी निश्‍चित केले आहे. यानूसार 6 वी ते 8 वी पर्यंत शिक्षकांना वर्षभरात 220 दिवसांत 1 हजार घडाळी तास अध्यापन करावे लागणार आहे. तर 1 ली ते 5 वी पर्यंत शिक्षकांना 200 दिवसांत 800 घड्याळी तास अध्यापन करावे लागणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या संदर्भात शिक्षण संचालक यांच्याकडे पाठपुरवा केला होता.
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये राज्य सरकारचे निर्देश असूनही बहुतांशी जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे कामकाज आणि सुट्ट्याबाबत विसंगती होती. या संदर्भात शिक्षक संघाने शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानूसार शालेय शिक्षण संचालकांनी 12 एप्रिला परिपत्रक काढून शालेय कामकाज आणि अध्यापनाचे तास निश्‍चित केले आहेत. आरटीई कायद्यानूसार आणि शासन निर्णय 29 एप्रिल 2011 नूसार शालेय कामकाजाबाबत प्राथमिक शिक्षण संचालयाने अंमलबजावणी केली नव्हती.

शिक्षण संघाने या बाबत पाठपुरवा केला. यामुळे 2012 संचालयाने आदेश काढत शालेय कामकाजाचा कालावधी निश्‍चित केला. मात्र, 2014 ला शिक्षण संचालकांनी 2012 अध्यापनाचे ते आदेश रद्द केले.
मात्र, त्यानंतर पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन शिक्षण संचालक नंदकुमार यांनी शालेय कामकाज निश्‍चित केले. त्याला अनुसरून 2017 ला पुढील शैक्षणिक कामकाज निश्‍चित करण्यात आले आहे. यात दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टीचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच दिवसाळीची सुट्टी कमी करून गणेशत्सव अथवा नाताळ या सारख्या प्रासंगिक सुट्ट्या देण्याचे अधिकार त्यात्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

मुख्याध्यापकांच अखत्यारितील सुट्ट्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला निश्‍चित करून शिक्षणधिकार्‍यांची मान्यता घेण्याचे आदेश आहेत.
यामुळे 6 वी ते 8 वी पर्यंत शिक्षकांना वर्षभरात 220 दिवसांत 1 हजार घडाळी तास अध्यापन करावे लागणार आहे. तर 1 ली ते 5 वी पर्यंत शिक्षकांना 200 दिवसांत 800 घडळ्या तास अध्यापन करावे लागणार आहे. या निर्णयाचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे, शरद वांढेकर, सुलभा दोंदे, देविदास बस्वदे, प्रकाश जाधव, सुनील पवळे, सर्जेराव राऊत, बाळासाहेब कदम, विष्णू बांगर, लक्ष्मण चेमटे, अशोक गिरी यांनी स्वागत केले आहे.

 यासह जिल्हाधिकारी हे स्थानिक सुट्ट्या जाहीर करणार असून त्या सुट्ट्या घेणे शिक्षक आणि शाळांना बंधनकारक राहणार आहे. सुट्ट्या निश्‍चित करतांना शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक संघटनांची बैठक घेवून त्यांना विश्‍वासात घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

LEAVE A REPLY

*