Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रायगडमध्ये होणार प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षक महासंघाला संलग्न असणार्‍या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अधिवेशन रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे 9 ते 14 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहेेत. या अधिवेशनासाठी शिक्षक बँकेने 50 हजार रुपये विशेष कर्ज मंजूर केले आहे. अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दिली. दरम्यान या अधिवेशनासाठी शासनाने 9 ते 14 मार्च अशी आठवडाभराची रजा मंजूर केली आहे. याबाबतचा आदेश शासनाने जारी केला आहे.

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहेेत. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास, व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंद, मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, ऊर्जा व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व महाराष्ट्र राज्य शिक्षक नेते संभाजीराव थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नगर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन  शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, दत्ता पाटील कुलट, चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, राजू साळवे, निळकंठ घायतडक, किसन वराट, विठ्ठल फुंदे, संदीप मोटे, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, भाऊराव राहिंज, बाळासाहेब सरोदे, नारायण पिसे, सत्यवान मेहेरे, विद्युल्लता आढाव, राजेंद्र सदगीर, सयाजीराव रहाणे, संभाजी आढाव यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!