शिक्षकांचे आझाद मैदानावर 1 ऑगस्टपासून धरणे

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील विनाअनुदानित असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट पासून बेमुदत कॉलेज बंद करून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. यामुळे राज्यातील सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
महाराष्ट्रातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या जवळपास 3 हजार 200 च्या वर आहे.
महाविद्यालात सुमारे 16 ते 17 वर्षापासून शासनाकडून वा इतर कोणाकडूनही एक रुपयाही न घेता पवित्र विद्यादानाचे काम करत आहेत. 26 फेब्रुवारी 2014 पासून राज्य शासनाने संबंधित महाविद्यालयाचा कायम शब्द काढून अनुदानासाठीची मूल्यांकन प्रक्रिया सुरु केली. परंतु आजपर्यंत सुमारे 3 वर्षे संपूनही अनुदान पात्र शाळांची यादी घोषित केली नाही. याबाबत समितीने आजपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी आंदोलने केली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही.
यामुळे जो पर्यंत महाराष्ट्रातील सर्व विनानुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी घोषित करून 100 टक्के निधीची तरतूद करून तात्काळ पगार सुरु करण्याचे आदेश निघत नाहीत तोपर्यंत 1 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. तरी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक, संपर्कप्रमुख अजित इथापे, समन्वयक प्रा. रवींद्र आगळे, जिल्हा अध्यक्षा प्रा. सुनीता गायकवाड, जिल्हा उपअध्यक्ष रोहित मोटकर व संजय बाबर यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*