आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 104 शिक्षकांना नेमणुकीचे आदेश

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या प्राथमिक शिक्षकांना सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाने नेमणुकीचे आदेश दिले. नेमणुकीच्या आदेशच्या प्रक्रियेला उपाध्यक्षा राजश्री घुले स्वत: उपस्थितीत होत्या. यावेळी मुख्य कार्यकार अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित होते.
जिल्ह्यात मराठी माध्यमातील उपाध्यापकांच्या 563 जागा रिक्त होत्या. जिल्ह्यात उपा

ध्यापकांच्या 10 हजार 172 जागा असून त्यातील 9 हजार 609 जागांवर शिक्षक कार्यरत आहेत. 563 ठिकाणी शिक्षक नसल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती. यासह गेल्या महिन्यांपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षक जिल्ह्यात राज्य सरकार पातळीवरून पाठवण्यात आले होते. मात्र, जिल्हातर्ंगत शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार होत्या.

जिल्ह्यात अनेक शाळांना शिक्षक नसल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना नेमणुकीचे आदेश देण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी ही प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात या सर्व शिक्षकांना बोलावून त्यांच्या आंतरजिल्हा बदलीच्या क्रमाकांनूसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रिक्त असणार्‍या ठिकाणी समुपदशेनाने नेमणुका देण्यात आल्या.

अकोले 3, कर्जत 10, कोपरगाव 5, जामखेड 2, नगर 7, नेवासा 15, पाथर्डी 9, पारनेर 7, राहाता 4, राहुरी 2, शेवगाव 7, श्रीगोंदा 14, श्रीरामपुर 7 आणि संगमनेर 8 यांचा समावेश आहे. चार शिक्षकांनी अवघड क्षेत्रात नेमुणक घेतली आहे.

LEAVE A REPLY

*