शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारकच

0

शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

गणोरे (वार्ताहर) – राज्यात शिक्षक भरती प्रक्रीयेमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची अनिवार्यता शासनाकडून पुन्हा एकदा अधोरेखीत केली असून यापुढे पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणार्‍यांच नियुक्ती देण्याचे परीपत्रक शासनाने काढले आहे. तर 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्ती असलेल्यांना तीन संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठीचा कालावधी निर्धारीत करून देण्यात आला आहे.

देशात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर शिक्षक भरती करताना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली. त्यानंतर भरती प्रक्रीया बर्‍यापैकी स्थिरावली होती. राज्यात 2013 नंतर खाजगी शिक्षण संस्थामध्ये भरती झाली आहे. तेथील उमेदवारांकरीता हे परीपत्रक म्हणजे मोठा झटका मानला जात आहे.

तर सरकारी शाळांमध्ये भरतीच झालेली नाही. त्यामुळे तेथे कार्यरत उमेदवारांना शासन निर्णयाची झळ बसणार नाही. मात्र 2019 पूर्वी राज्यात जे शिक्षक प्रशिक्षित नाही त्यांना त्यानंतर सेवेला रामराम ठोकावा लागणार आहे. केंद्रसरकारने शिक्षण हक्क कायद्यानूसार अंतिम मुदत वाढ दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने पात्रता परीक्षेची सक्ती केल्याने अनेकांना तयारी करावी लागेल असे चित्र आहे.

शेवटची संधी…
13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्ती देण्याच आलेल्या उमेदवारांना देखील ही परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यांना 30 जून 2016 नंतर सलग तीन पात्रता परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. त्या शिवाय त्यांना सेवेत राहता येणार नाही. यामुळे ही संधी शेवटची असणार आहे.

LEAVE A REPLY

*