अंबळनेरमध्ये माध्यमिक शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरु

0
अंबळनेर (प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपक देवराम पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. त्यांचा मृत्यू कशामूळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रा. पाटील हे शहरातील न्यू प्लॉट भागातील डॉ. हजारे अक्सिडंट हॉस्पिटलच्या बाहेर मृतावस्थेत पडलेले आढळून आले. पोलिसांनी रात्री त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पायांवर मार लागलेला होता. प्राथमिक स्वरूपात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रा. पाटील हे रात्री आपल्या मुलीला मोटारसायकल शिकवत होते. त्यानंतर त्यांनी धोबीला पैसे देऊन सकाळी लग्नाला जायचे असल्याने इस्तेरीचे कपडे आणले. १० वाजेच्या सुमारास त्यांना कोणाचा तरी फोन आल्याने ते बाहेर गेले. मात्र रात्री उशिरा पर्यंत परतले नाहीत.

त्यांच्या पत्नीने फोन लावला असता फोन बंद आढळून आला अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. नातेवाईकाच्या सांगण्यानुसार रात्री दीड वाजता दीपक हजारे अक्सिडंट हॉस्पिटल समोर डॉक्टरांना बोलव माझा अपघात झाला आहे असे सांगत होता.

डॉक्टर नसल्याने प्रा. पाटील रस्त्यावरच पडून होते. सुमारे सव्वा दोन वाजेच्या सुमारास या भागातील रहिवाशी नंदूरबारचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांच्या भावजयीने त्यांना सांगितले की, कोणीतरी माणसाच्या पायाला कुत्रे ओढत आहेत. तेव्हा गिरीश पाटील यांनी पोलिसांना बोलावले.

रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी मयत दीपक यांना रुग्णालायत दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केले. दीपक यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यांची मोटारसायकल अद्याप मिळून आली नाही. भ्रमणध्वनीच्या सीडीआरवरून प्रकरण उघडकीस येईल, असे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले. प्रा पाटील यांचा मृत्यू अपघाताने झाला की काही घातपात झाला याचा तपास पोलीस करित आहे.

LEAVE A REPLY

*