Type to search

Featured सार्वमत

जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेची आत्महत्या

Share

जामखेड (प्रतिनिधी)- जामखेडमध्ये जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेच्या शिक्षिका सौ. विजया नितीन वराट वय 40 (माहेरचं नाव विजया सीताराम गुजर) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा सासू सासरे, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण आद्याप समजू शकले नाही. विजया वराट या जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची शाळा याठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून शिक्षिका म्हणून काम पहात होत्या. मात्र सध्या शाळांना सुट्टी आसल्याने त्या घरीच होत्या. बुधवार दि. 15 मे रोजी रात्री शिक्षिका वराट या झोपण्यासाठी म्हणून आपल्या बेडरूममध्ये गेल्या होत्या. यावेळी घरातील मंडळी हे मोठ्या हॉलमध्ये बसले होते.

त्यावेळी त्यांचे पती नितीन शिवाजी वराट हे कामा निमित्ताने बाहेर गेले होते. याच दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उशिरा त्यांचे पती बाहेरुन घरी आल्यावर व बेडरूममध्ये गेले असता लक्षात आले. त्यांना तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांचे पती देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात व परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!