Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

राज्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला प्रारंभ

Share

संगमनेर (वार्ताहर)  – राज्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल भरती प्राधान्यक्रम भरण्याच्या दृष्टीने संकेतस्थळावरती उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 31 मेपर्यंत उमेदवारांनाही संधी उपलब्ध असणार आहे.
गेले अनेक वर्ष प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरती करण्यात आलेली नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारने वारंवार सुतोवाच केले होते. मात्र त्यातही अनेकदा खंड पडत होता. कधी संस्थाचालक न्यायालयात, कधी उमेदवारांची आंदोलन, तरी कधी शासन निर्णय या ना त्या कारणाने ही प्रक्रिया पुढे ढकलली जात होती. अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टलवरती उमेदवारांनी आपल्या प्राधान्यक्रमाचा शाळा निवडण्यासाठी 31 मे पर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आली असून 1 ते 10 जून या कालावधीत निकाल प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 10 ते 16 जून या कालावधीत मुलाखती संस्था पातळीवर घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 17 जुनपासून शाळेत रुजू होता येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहेत.

शिक्षक भरतीसाठी प्राथमिक स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असून त्यासोबतच बुद्धिमापन चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. तसेच आर्थिक सामाजिक आरक्षण, महिला आरक्षण, मागासवर्गीय आरक्षण, त्यासाठीची विविध कागदपत्रे पठताळणी याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. संकेत स्थळावर माहिती भरताना काय काळजी घ्यावी ती माहिती कशी भरावी यासंदर्भात माहिती देणार व्हिडिओ युट्यूबवरती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती समजते.

एका उमेदवाराला 10 संधी
पवित्र पोर्टल वरती ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने संस्थांची निवड केली आहेत, अशा उमेदवारांना दहा वेगवेगळ्या संस्थांमध्ये मुलाखत देता येणार आहेत. त्या मुलाखतीदरम्यान निवड झाल्यानंतर सदरची यादी संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निवडलेल्या उमेदवारांचा विचार गुणात्मक दृष्ट्या करण्यात येणार आहे. त्यामुळे यात अधिक पारदर्शकता येईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

काही संस्थांनाही नको आहेत मुलाखती
राज्यात खासगी संस्थांची शिक्षक भरती करताना शिक्षक पात्रता परीक्षा, पदवी, आरक्षण या संदर्भाने नियुक्ती देतानाच संस्थाचालकांनी अध्यापन कौशल्य, विषय ज्ञान या संदर्भात पडताळणी करण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. मात्र राज्यातील काही संस्थांनी मुलाखती न घेण्यासंदर्भात निर्णय शासनाला कळविला असल्याचे समजते. त्यांनी संकेतस्थळावरती मुलाखतीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धोरणाप्रमाणे आपल्यालाही शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी विनंती शासनाला केली असल्याचे वृत्त आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरळ नियुक्ती
राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करताना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णते बरोबर त्या विद्यार्थ्यांचे गुण त्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी निश्‍चित करतील. त्यातून उमेदवारांना कोणत्याही मुलाखतीशिवाय नियुक्ती देणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडलेले उमेदवार शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत हजर होऊ शकतील असा अंदाज आहे.

संस्थाचालक 30 गुणांचे करणार मुल्यांकन
राज्यात न्यायालयीन प्रक्रियेनंतर भरती प्रक्रियेसाठी संस्थाचालकांना अधिकार होते. ते प्राप्त झाल्यानंतर संस्थाचालक कुणाची मुलाखत घेऊ शकणार आहे. यात अध्यापन कौशल्य, विषय ज्ञान या संदर्भाने मुलाखत घेतली जाणार आहे. संस्थेकडे शासनाने पाठवलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर मिळालेल्या गुणांच्या आधारे प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येणार आहे. ज्या ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यांना मिळालेले गुण संकेतस्थळावरती नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!