शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही करावी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – 27 फेब्रुवारीच्या 2017 च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना जिल्ह्यातंर्गत बदल्यांची कार्यवाही त्वरित पूर्ण करून लगेच कार्यमुक्तीचे आदेश देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शासन निर्णयान्वये जिल्ह्यातंर्गत बदल्यांची कार्यवाही 11 नोव्हेंबरपूर्वी न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सन 2017-18 च्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपलेले असून, दुसर्‍या शैक्षणिक सत्राची लवकरच सुरुवात होत आहे. यामुळे बदल्यांची कार्यवाही त्वरित करून कार्यमुक्त केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोईच्या ठिकाणी काम करणारे अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदलीची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाने प्रथमच फेब्रुवारीचा सर्वसमावेशक शासन निर्णय आणून त्यांच्या आशा पल्लवीत केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
27 फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये विशेष शिक्षक संवर्ग भाग 1 मधील विधवा, परित्यक्ता, कुमारिका यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळून सोयीच्या ठिकाणी बदली होणार आहे. तसेच भाग 2 अंतर्गत तीस किलो मीटरपेक्षा जास्त अंतरावरील पती-पत्नीचे एकत्रीकरण होऊन, त्यांचे कुटुंब एक होऊ शकणार आहे. तर वर्षानुवर्षे दर्‍या-खोर्‍यात, डोंगराळ, दुर्गम भागात काम करणार्‍या शिक्षकांना न्याय मिळून प्रथमच ते सोयीच्या ठिकाणी येणार आहेत. संवर्ग 4 मधील अर्थात बदलीपात्र असणारे टप्पा क्रमांक 5 मधील हे शिक्षक सध्या गैरसोयीच्या ठिकाणी आहेत व त्यांना विनंती बदली हवी आहे, अशा शिक्षक-शिक्षिकांची बदली कार्यवाही त्वरित करून, लगेच कार्यमुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गजानन जाधव, माऊली पानसरे, शिवाजी नवाळे, वैशाली गायकवाड, चंदाराणी डिंबर, अच्युत घुले, आजिनाथ पांढरे, मनीषा साखरे, सुनील नरसाळे, भास्करराव खोडदे, मच्छिंद्र कदम, गोरक्षनाथ रोकडे, प्रसाद कुलकर्णी, हळगांवकर, दादा चोभे, संतोष मोरे, अनिल नाईक, कैलास साकुळे, ज्ञानेश्‍वर जाधव, जयराम सातपुते, हरीभाऊ भोस शकुंतला गव्हाणे, आनंदा साबळे, कविता हराळ, राहुल गंडाळ आदींसह प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*