विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन

0
विरोधी पक्षनेत्यांना दिले निवेदन
भेंडा (वार्ताहर) – कायम विनाअनुदानित हा शब्द वगळल्यापासून राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान व शिक्षकांनाही 100 टक्के पगार सुरू करण्यात यावा या मागणीसाठी राज्यातील शिक्षक संपावर गेले असून मुंबईत धरणे आंदोलन सुरू आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मुंबईत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 16 ते 17 वर्षांपासून एकही रुपया न घेता विद्यादानाचे काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे.
म्हणून त्यांचा अनुदानपात्र याद्या घोषित करून शाळांना 100 टक्के निधी उपलब्ध करून व शिक्षकांना तात्काळ 100 टक्के पगार सुरू करावा या मागणीसाठी राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 1 ऑॅगस्टपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत. आंदोलनात 3 हजार 200 शाळांमधील 22 हजार 500 शिक्षक सहभागी झाले आहेत.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून मागे हटणार नाही. नेवासा तालुक्यातील 18 शाळांमधील 57 शिक्षक या आंदोलनात सहभागी आहेत.
– प्रा. राजेंद्र गवळी
(अध्यक्ष, नेवासा तालुका कृती समिती)

LEAVE A REPLY

*