शिक्षक पात्रता परीक्षा : आजपासून ऑनलाईन अर्ज

0
गणोरे (वार्ताहर) – राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी बंधनकारक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 22 जुलै रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी 15 ते 30 जून या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
राज्य शासनाने टीईटी परीक्षेचे आयोजन करून ती पार पाडण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवलेली आहे.
राज्यातील सर्व पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक अथवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानुसार टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.
टीईटी परीक्षेसाठी 15 जून ते 30 जून या कालावधीमध्ये विहित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. संकेतस्थळावर 10 ते 22 जुलै या कालावधीमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होतील. त्यानंतर 22 जुलै रोजी परीक्षा पार पडणार आहे.
पहिला पेपर 22 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 1 या वेळेत तर दुसरा पेपर दोन ते साडे तीन या वेळेत पार पडेल. माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळास भेट द्यावी.

 www.mahtet.in www.mscepune.in परीक्षेचे वेळापत्रक कार्यवाही  ऑनलाईन अर्ज भरणे 15 जून ते 30 जून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध 10 जुलै ते 22 जुलै टीईटी पेपर 1- 22 जुलै सकाळी 10.30 ते दुपारी 1 टीईटी पेपर 2- 22 जुलै दुपारी 2 ते दुपारी 3.30

LEAVE A REPLY

*