शिक्षक सहकार संघटनेचे झेडपीत धरणे

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीमध्ये झालेल्या गंभीर चुकाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने शनिवारी जिल्हा परिषदेच्या आवारात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. न्याय मागण्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिक्षकांच्या आंदोलनास शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी आंदोलनास पाठिंबा देवून, हा लढा व्यापक करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्‍वासन दिले.
आंदोलनात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षिकांनी जोरदार निदर्शने केल्याने जिल्हा परिषदेचा परिसर दणानून निघाला होता. या आंदोलनात जयदिप मोकाटे, सतीश जपकर, वसंत कुलट, विनोद पवार, संजय लांडगे, निलीमा जोशी, सुजाता ढवळे, संदिप जाधव, बाळासाहेब मावळे, निलेश काळे, प्रदिप कवडे, विशाल कुलट, जयनाथ वामन, अण्णासाहेब दिघे, देविना कुमटकर, निवृत्ती बेंद्रे, अजित घोडके आदि शिक्षक सहभागी झाले होते.
प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावली रोष्टरची निपक्षपातीपणे पुर्नपडताळणी करण्यात यावी. दोन एनओसी धारकांना तात्काळ सामावून घेण्यात यावे. अतिरिक्त ठरलेल्या पहिल्या ऑनलाईन बदली टप्प्यातील विविध संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना अंतरजिल्हा बदलीने समावून घेवू नये. पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबवून सदर अहवाल ग्रामविकास मंत्रालयास तात्काळ कळवावा.
गहाळ झालेल्या निवड सुच्यांबाबत संबंधीतांवर जबाबदारी निश्‍चित करुन कारवाई करावी. आंतर जिल्हा बदलीची सर्व प्रकरणे जो पर्यंन्त निकाली निघत नाही तो पर्यंन्त कोणत्याही प्रकारचे समायोजन व नवीन भरती प्रक्रिया न राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

*