शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षपदी कोपरगावच्या विद्युलता आढाव

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षपदी कोपरगावच्या संचालिका विद्युलता ताई आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाची विशेष सभा जिल्हा निबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक हरीष कांबळे यांचे अध्यक्षते खाली नुकतीच पार पडली.
सुरवातीस बँकेचे अध्यक्ष व गुरुमाऊली मंडळाचे नेते रावसाहेब रोहोकले यांनी मंडळाच्या सुकाणू समितीने महिलांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय संचालक मंडळाच्या सभेत जाहीर केला. त्यास सर्व संचालकांनी टाळयाच्या गजरात मान्यता दिली. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण यांनी विद्युलताताई आढाव यांचे नाव सुचविले त्यास संचालक बाबासाहेब खरात यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर बँकेचे अध्यक्ष रोहोकले यांनी मावळते उपाध्यक्ष दिलीप औताडे तसेच नूतन उपाध्यक्षा आढाव यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना आढाव यांनी गुरुमाऊली मंडळाने संचालक मंडळात चार महिलांना संधी दिली. तसेच उपाध्यक्षपदी महिलेची निवड करुन बँकेत महिला सबलीकरणाचा नवा इतिहास निर्माण केल्याचे सांगत गुरुमाऊली मंडळाच्या धोरणाप्रमाणे सभासद हिताचा कारभार करु असे सांगितले.
याप्रसंगी गुरूमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, संघाचे अध्यक्ष संजय शेळके, उच्चाधिकारचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, नाशिक विभाग अध्यक्ष आबा जगताप, विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, नगर पालिका संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे, निळकंठ घायतडक, राम निकम, आर. टी. साबळे, बाबा पवार, अल्ताफ शाह, प्रताप देवरे, जलील शेख, नवेद मिर्झा, बाळासाहेब सरोदे, राजू ईनामदार, विश्वस्त सर्जेराव घोडक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख, दिलीप मुरदारे आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
………..

LEAVE A REPLY

*