शिक्षक बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

0

‘गुरुकुल’चा दावा : साडेतीन कोटीचा तोटा, चेअरमनच्या दालनाला टाळे ठोकणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला साडेतीन कोटीचा तोटा झाल्याचा आरोप करून बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्याचा दावा गुरुकुल मंडळाने केल्याने बँकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. तोटा झालेला असताना दीड कोटीचा नफा झाल्याची माहिती देणार्‍या संचालक मंडळाने सभासदांचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप करून बँकेच्या अध्यक्षांंनी तातडीने पायऊतार व्हावे, अन्यथा त्यांच्या दालनाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा ‘गुरुकुल’ने दिला आहे.

आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचा आभास निर्माण करणे ही अध्यक्ष रोहकले यांची सवय आहे. कोणाचेही ऐकायचे नाही. चुकीचे असले तरी आपलेच खरे म्हणत निर्णय रेटायचे. पदाला चिटकून राहायचे, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. शिक्षकांच्या बदल्यांवर तावातावाने बोलणार्‍या या अध्यक्षांनी बँकेत मात्र ज्येष्ठ कर्मचार्‍यांच्या गैरसोयीच्या बदल्या केल्या. गैरव्यवहार झाकण्यासाठी बँकेला नफा झाल्याचे खोटेच सांगितले. रिझर्व बँकेने अखेर या भ्रष्ट कारभारास चाप लावला आहे.
-डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

LEAVE A REPLY

*