Type to search

Featured सार्वमत

शिक्षक बँक अध्यक्षपदाचा प्रभारी भार उपाध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडे !

Share

जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षा सीमा क्षीरसागर (निकम)यांची बँकेच्या अध्यक्षपदी प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी नुकतेच शिक्षक बँकेला दिले आहे. शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर चेअरमन पदाचा पदभार क्षीरसागर (निकम) यांचेकडे सोपविण्यात आला आहे. अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत हा पदभार क्षीरसागर यांच्याकडेच राहणार आहे.

क्षीरसागर या जामखेड येथील जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष राम निकम यांच्या पत्नी असून त्या एक उपक्रमशील व आदर्श शिक्षिका म्हणून परिचित आहेत. क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड करून जामखेड तालुक्याला 1999 नंतर 20 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. क्षीरसागर या शिक्षिका म्हणून 2 सप्टेंबर 1998 रोजी मराठी मुले जामखेड येथे सेवेची सुरुवात केली. जामखेड येथील सर्वसाधारण जागेवर पहिल्या महिला संचालिका म्हणून त्यांना संधी मिळाली होती. बँकेचे सध्या शताब्दी वर्ष असून या शताब्दी वर्षांमध्ये महिला संचालिकेस उपाध्यक्षपदासोबतच अध्यक्षपद या दोन्ही संधी मिळाल्याने महिलांचा सन्मान बँकेने केला आहे. या निवडीबद्दल बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, संचालक मंडळ, जिल्हाध्यक्ष संजय शेळके, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुम्बे, केंद्रप्रमुख सरचिटणीस निळकंठ घायतडक, आर. पी रहाणे, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, दिगंबर पवार, उत्तम पवार, नारायण लहाने, राजू कर्डिले, राजू मोहळकर, अनिल कुलकर्णी, सुभाष फसले, दत्तात्रय आंधळकर, माजिद शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

जिल्हा शिक्षक बँकेचा पदभार उपाध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडे देण्याचा निर्णय गुरूमाऊली मंडळाला अंधारात ठेवून घेण्यात आला आहे. याबाबत मंडळाच्या एकाही पदाधिकार्‍याला कल्पना नाही.
-बाळासाहेब तापकीर, कार्यालयीन चिटणीस, गुरूमाऊली मंडळ.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!