Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

मोदी म्हणजे गिळंकृत करणारा अॅनाकोंडा’; आंध्रच्या मंत्र्यांची टीका

Share

अमरावती (आंध्र प्रदेश) : दोन दिवसांपूर्वीच काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी केल्यानंतर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाचे नेते आणि मंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जहरी’ टीका केलीय. मोदी हे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करणारे अॅनाकोंडा आहेत. मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडी कोणी असू शकतो का? ते सीबीआय, आरबीआयसारख्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतात, असं ते म्हणाले.

रामकृष्नुदु म्हणाले की, ते (मोदी) सीबीआय, आरबीआय आणि त्यासारख्या दुसऱ्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतील, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रदेश भाजपानेही टीडीपीवर पलटवार केला असून एन चंद्राबाबू नायडू हे भ्रष्टाचाराचे राजा असून त्यांच्या भ्रष्टाचारांचा आता खुलासा होईल, असा धमकीवजा इशाराच दिला आहे. सध्या देशाला भाजपापासून वाचवणे हेच टीडीपीचे तत्कालिक कर्तव्य असल्याचे रामकृष्नुदु यांनी स्पष्ट केले आहे.

देशाला भाजपपासून वाचवणे हे आमच्या पक्षाचं कर्तव्य आहे. देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची प्राथमिक जबाबदारी आपली प्रत्येकाचीच आहे, असं सांगून त्यांनी भाजप, मोदींसह वायएसआर काँग्रेस आणि जनसेनेवरही हल्ला चढवला. हे सर्व पक्ष राष्ट्रीय संस्था आणि लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या मोदींचे समर्थन करत आहेत, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!