महापारेषणने थकविला झेडपीचा दीड कोटीचा कर

0
जिल्हा परिषद ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- थकबाकीच्या कारणावरून महावितरण कंपनी जिल्हा परिषदेला नेहमीच वीजजोड तोडण्याची धमकी देत असते. मात्र, याच महावितरण कंपनीशी संलग्न असणार्‍या महापारेषण कंपनीने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मल ग्रामपंचायतीचा दीड कोटी रुपयांचा कर 2014 पासून थकविला आहे.
ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेची उपसंस्था आहे. या संस्थेवर जिल्ह परिषदेचे प्रत्यक्षात नियंत्रण आहे. याच जिल्हा परिषदेला आतापर्यंत अनेक वेळा प्रादेशिक पाणी योजनांचे वीज बिल थकल्या प्रकरणी महावितरण कंपनीने वीजजोड तोडण्याची धमक्या दिल्या आहेत. मात्र, महापारेषण कंपनीने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मल ग्रामपंचायतीचा दीड कोटी रुपयांचा कर 2014 पासून थकविला आहे.
पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत महापारेषण कंपनीचे 400 केव्हीचे केंद्र असून त्या केंद्राचा कर 2014 पासून थकीत आहे. या थकीत करासाठी पिंपरी निर्मळ ग्रामपंचातीने महा पारेषणच्या बाभळेश्‍वर कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवा करून ग्रामपंचायतीचा दीड कोटीचा थकीत कर वसूल झालेला नाही.
ही बाब राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन थकबाकी वसूलीसाठी ग्राहक न्यायालयात जाण्याच्या तयार आहे. याबाबतच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*