Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकर सल्लागार 29 जानेवारीला करणार देशव्यापी आंदोलन

कर सल्लागार 29 जानेवारीला करणार देशव्यापी आंदोलन

पुणे | Pune

केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली विरोधात कर सल्लागार येत्या 29 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करणार आहे. असे कर सल्लागारांच्या संघटनेनं सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

- Advertisement -

पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेज जवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता होणार आहे. या आंदोलनात कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल आणि संबोधीत घटक सहभागी होणार आहेत.

भारतातील कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी, या तणावात ते असतात. छोट्या मध्यम व्यापार्‍यांना खरेदी-विक्री, वसूली, बँक लोन, हिशोब, कर कायदे पूर्तता ही सर्व कामे स्वत: करावी लागतात. गेल्या तीन ते पाच वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. कर खात्यास कर चुकविणार्‍यांना जेरबंद करता येत नाही.

म्हणून दर वर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी निषेध नोंदविण्याचे आम्ही ठरवले आहे.

आंदोलनाच्या दिवशी सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल काळे कपडे परिधान करून, काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या