Type to search

Breaking News Featured मार्केट बझ मुख्य बातम्या

‘टाटा’ची इलेक्ट्रिक कार लॉन्च; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार २१३ किलोमीटर

Share

मुंबई | प्रतिनिधी

टाटा मोटर्सकडून नुकतीच नवी कोरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार २१३ किमी धावू शकते असा दावा कंपनीकडून केला जात आहे. सध्या या कारची जोरदार चर्चा सोशल मीडियात असून अनेक ठिकाणी या कारचे फोटो व्हायरल झाले आहेत. टिगोर ईव्ही इलेक्ट्रिक असे या कारचे नाव आहे.

टाटा टिगोर कार एक्सईप्लस, एक्सएमप्लस आणि एक्सटीप्लस असे तीन प्रकारांत बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यातील तीस मोठ्या शहरांमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असून कारची एक्स शोरूम किंमत ९.४४ लाख रुपये इतकी असल्याचे कळते आहे.

उच्च श्रेणीतील इलेक्ट्रिक टिगोर एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर २१३ किमीपर्यंत धावू शकेल असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये २१.५ kWh ची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये १६,२ kWh बॅटरी पॅक आहे. इलेक्ट्रिक टिगोरमध्ये एक ७२ व्ही, ३-फेस एसी इंडक्शन मोटर देण्यात आली आहे, जी ४,५००० आरपी वर ३० केडब्ल्यू (४१ एचपी) ऊर्जा आणि २,५०० आरपीएम वर १०५ एनएम टॉर्क जनरेट करते.

ही आहेत वैशिष्ट्ये

इलेक्ट्रिक टिगोरच्या टॉप व्हेरिएंट एक्सटी + मध्ये ब्लूटूथसोबत हार्मोनचा २ डीआयएन ऑडिओ सिस्टिम.

यूएसबी आणि एएक्स कनेक्टिव्हिटी.

१४ इंच अ‍लॉय व्हील्ज.

सीटची उंची कमी जास्त करता येऊ शकते.

शार्क फिन अँटेना आणि एलईडी टेल लॅम्पसह ऑडिओ सिस्टम

अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस)

एक्सई + व्हेरियंटमधील फक्त ड्रायव्हरच्या बाजूने एअरबॅग

इतर दोन्ही प्रकारांमध्ये ड्युअल एअरबॅग.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!