Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

आता लक्ष समान नागरी कायद्याकडे ?

Share

नवी दिल्ली – केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने दीर्घकालीन अजेंड्यातील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी कलम 370 आणि अयोध्येत राम मंदिराची लक्ष्यपूर्ती अवघ्या तीन महिन्यांच्या अंतरातच केल्यामुळे आता समान नागरी कायद्याचे वेध लागले आहेत. समान नागरी कायदा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग असून, केंद्रातील मोदी आणि शहा यांचे सरकार संसदेत हे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून आणखी एक धक्का देईल काय, याकडे आता लक्ष लागले आहे.

कलम 370, अयोध्येत राम मंदिर आणि समान नागरी कायदा संघाच्या अजेंड्यावर सुरुवातीपासूनच आहेत. जनसंघाच्या अवतारात साध्य न झालेल्या आणि अशक्यप्राय वाटणार्‍या या अजेंड्याचा भाजपही गेल्या 39 वर्षांपासून आक्रमकपणे पाठपुरावा करीत होता; परंतु 2019 मध्ये संघ-भाजपच्या या स्वप्नपूर्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरले. 2019 च्या शेवटच्या चार महिन्यांत कलम 370 रद्द करण्याबरोबरच अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती, हे दोन मुद्दे अवघ्या 97 दिवसांच्या अंतराने लिलया मार्गी लागले.

कलम 370 रद्द करण्यासाठी मोदी सरकारला संसदेत धक्कातंत्राचा वापर करावा लागला, तर गेल्या तीस वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात ध्रुवीकरण निर्माण करणार्‍या अयोध्येतील राम मंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रशस्त झाला आहे. त्यामुळे आणखी एक धक्का देऊन मोदी सरकार समान नागरी कायद्याचा विषयही मार्गी लावणार काय हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!