‘तारक मेहता’ मालिकेत लवकरच परतणार ‘दया बेन’

0
मुंबई- टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय दया बेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच मालिकेत परतणार आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्या वर्षीपासून सुट्टीवर आहे. गेल्यावर्षी तिने स्तुती या गोंडस मुलीला जन्म दिला. नव्या वृत्तानुसार दिशा आता पुन्हा तारक मेहताने कमबॅक करत आहे.

दिशा पुढील दोन महिन्यांत ‘तारक मेहता’ मध्ये वापसी करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती काही महिने रजेवर होती. गेल्या काही दिवसांपासून दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या. तिची मुलगी फार लहान असून सध्या तिला मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, म्हणून ती मालिकेला कायमचे अलविदा करणार असल्याचे म्हटले जात होते.

LEAVE A REPLY

*