दयाबेनच्या वापसीविषयी निर्माते असित कुमार मोदींची प्रतिक्रिया

0
तारक मेहता फेम दिशा वकानी शोमध्ये दिसणार ?
मुंबई : टीव्ही सिरीयल मध्ये सर्वाधिक विनोदी सिरीयल म्हणून लोकप्रिय ठरलेली तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन चा विषय सध्या चर्चेत आहे .या मालिकेत दयाची भूमिका साकारणारी दिशी वकानी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दयाची बोलण्याची स्टाइल, कोणतेही कारण नसताना ती करत असलेला गरबा हे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे या मालिकेतील दया ही प्रेक्षकांची सगळ्यात आवडती आहे. पंरतु गेल्या काही काळापासून दयाबेन सिरीयलमध्ये दिसत नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान दयाबेनने मालिका सोडली असल्याच्या अफवा देखील चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. दयाने काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे आणि त्यामुळे ती तिचा सगळा वेळ हा तिच्या मुलीसोबतच घालवत आहे. दयाने गरोदर असताना देखील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण केले होते. तिने सप्टेंबर महिन्यापर्यंत या मालिकेसाठी चित्रीकरण केले होते. ही मालिका तिच्यासाठी खूप खास असल्याने तिने हा निर्णय घेतला होता.

आता ती मार्च महिन्यात पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असून मार्चनंतर प्रेक्षकांना तिला या मालिकेत पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण सध्या तिला तिच्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्यायचे असल्याने तिने ही मालिका सोडली असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून येत आहे. दिशा मालिका सोडणार हे कळल्यावर तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता.

दिशाने मालिका सोडली नसल्याचे मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, दिशीची मुलगी लहान असल्याने तिला सांभाळून चित्रीकरण करणे माझ्यासाठी सोपे नाहीये. दिशा पुन्हा चित्रीकरण करायला कधी सुरुवात करणार हे अजून काहीही ठरलेले नाही. तसेच ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडणार असल्याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आमच्याकडून करण्यात आलेली नाहीये.

LEAVE A REPLY

*